Chitrangda Singh : अभिनेत्री  चित्रांगदा सिंह (Chitrangda Singh) ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रांगदा ही अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मिती देखील करते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुरमा या चित्रपटामधून तिनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचे कथानक हॉकी खेळाडू संदीप सिंह (Sandeep singh) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये  तापसी पन्नू (Taapse Paanu) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) या कलकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता चित्रांगदा आणखी एका व्यक्तीची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.


कारगिल युद्धात लढलेले योगेंद्र यादव यांची शौर्यगाथा दर्शवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती चित्रांगदा सिंह करणार आहे. वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्रानं सन्मानित होणारे आजपर्यंतचे सर्वात तरुण व्यक्ती योगेंद्र यादव आहेत. 'मी रिअरल हिरोच्या कथा सांगायला खूप उत्सुक आहे. हे हिरो अजूनही आपल्यामध्ये राहतात तरीही अनेकदा यांचा आपल्याला विसर पडतो. त्यांच्या प्रवासाचा गौरव करायला हवा.' असं  चित्रांगदानं सांगितलं. या आगामी चित्रपटाचे राइट्स हे  दीपक सिंग यांच्या सह-मालकीच्या सीएसफिल्म्सकडे आहेत. चित्रांगदाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुक वाट बघत आहेत. 


चित्रांगदाचे चित्रपट:


चित्रांगदा ही मॉडर्न लव्ह मुंबई या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच तिचा गॅसलाईट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विक्रांत मेसी आणि सारा अली खान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  2003  मध्ये रिलीज झालेल्या 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटामधून चित्रांगदानं पदार्पण केलं.  सॉरी भाई, ये साली जिंदगी, इन्कार या चित्रपटांमधील चित्रांगदाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा: