Ravi Teja : साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'मास राजा' नावाने ओळखणारा रवी तेजा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. कर्तृत्व आणि अभिनयाच्या जोरावर जवळपास तीन दशके साउथ इंडस्ट्रीवर रवी तेजाने राज्य केले आहे. परंतु, रवीच्या खूप कमी चाहत्यांना त्याचे खरे नाव माहित आहे. रवी तेजाने अॅक्शनपासून कॉमेडी सीन्सपर्यंत टॅलेंट दाखवला आहे. रवी तेजा याला मास महाराजा नावा चाहते ओळखतात. परंतु त्याचे पूर्ण नाव विशंकर राजू भूपतिराजू असे आहे.
रवी तेजा याचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. रवी तेजा याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी तो चेन्नईला आला.
रवीने जबरदस्त ऑडिशन दिले. त्याने 1990 ते 1996 पर्यंत खूप मेहनत आणि संघर्ष केला. रवी तेजा याला अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. त्याने 1990 मध्ये पहिला चित्रपट केला. त्यामध्ये तो साइड रोलमध्ये होता.
1999 मध्ये 'नी कोसम' चित्रपटात रवीने लीड हिरो म्हणून पहिल्यांदा काम केले. 'नी कोसम'ने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटासाठी रवी तेजा याला एक पुरस्कारही मिळाला. त्याचे काम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आसतात. रवी तेजाची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला रवी तेजा आता खिलाडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाल करण्याच्या तयारीत आहे.
महत्वाच्या बातम्या
Padma Awards: हा तर लावणीचा सन्मान, या क्षणी पतीची आठवण येतेय; पद्मश्री मिळाल्यानंतर सुलोचना चव्हाण यांचे डोळे पाणावले
Padma Awards: सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला यांना पद्मभूषण जाहीर, भारतीय वंशाच्या चौघांचा गौरव