Samrat Prithviraj : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) हा चित्रपट 3 जून रोजी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chillar) आणि सोनू सूद (Sonu Sood) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण  हा चित्रपट आणखी जास्त कमाई करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. याबाबत आता सोनू सूदनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामध्ये सोनू सूदनं चांद बरदाई ही भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये सोनूनं या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं. सोनू म्हणाला, 'हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला खूप चांगली भूमिका सारकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मी प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानतो. ' सोनूनं पुढे सांगितलं, 'चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे कमाई केली नाही. कोरोनानंतर अनेक गोष्टी बददल्या आहेत हे आपल्याला हे स्विकारावे लागेल. लोकांनी जेवढा प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मला आनंद आहे. '






सम्राट पृथ्वीराजनं आत्तापर्यंत 39.40 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं 10.70 कोटींची कमाई केली होती. सोनू सूद काही दिवसांपूर्वी रोडीज या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.  आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो.   


हेही वाचा :