मुंबई : लग्नानंतर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावणं, फार कॉमन झालं आहे. मात्र काही दुटप्पी सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे. लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे.
आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. 'सोनम कपूर' हे नाव बदलून तिने 'सोनम के अहुजा' असं ठेवलं.
स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी, अनेकांचं रोल मॉडेल असलेल्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती? असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
काही सोशल मीडिया यूझर्स मात्र हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचं सांगतात. नावात बदल करणं हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
फक्त सोनमनेच नाही, तर तिचे पती आनंद अहुजांनीही आपल्या नावापुढे सोनमचं नाव लावलं. आनंदने आपल्या इन्स्टाग्रामवर 'आनंद एस अहुजा' नाव बदललं. एकीकडे आनंदनं पाडलेल्या नव्या पायंड्याचं कौतुक होतं आहे, तर सोनमला मात्र टार्गेट केलं जात आहे.
यापूर्वी ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित-नेने, लारा दत्ता-भूपती, करिना कपूर-खान अशा अनेक अभिनेत्रींनी दोन आडनावं लावली आहेत. मराठीमध्येही किशोरी शहाणे-वीज, पद्मजा फेणाणी-जोगळेकर असे दोन आडनावं लावणारे कलाकार आहेत.
पती आनंद अहुजाचं नाव लावल्याने सोनम कपूर ट्रोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2018 10:46 PM (IST)
पती आनंद अहुजाचं नाव लावल्याने सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे
सोनमच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -