Sonam Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं. सोनमनं नुकतच तिचं मुंबईमधील  (Mumbai) आलिशान घर विकलं आहे. या घराची डील झाल्यानं सोनमला फायदा झाल आहे. 


सोनमनं सात वर्षांपूर्वी खरेदी केलेला मुंबईमधील तिचा फ्लॅट विकला आहे. सोनमचा हा फ्लॅट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होता, हे शहरातील सर्वात लोकप्रिय ठिकाण मानले जाते. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सोनमनं हा फ्लॅट 29 डिसेंबरला 32.5 कोटीला विकला. सोनमनं हा फ्लॅट 2015 मध्ये खरेदी केला. 2015 मध्ये तिनं हा फ्लॅट 31.48 कोटींना खरेदी केला आहे. आता सात वर्षानंतर हा फ्लॅट विकल्यावर तिला 1  कोटींचा फायदा झाला. रिपोर्टनुसार, सोनमनं नवा फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याच्या स्टँप ड्युटीसाठी तिनं सुमारे 1.95 कोटी रुपये खर्च केला आहे. 


2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.






सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 4 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!