सोनम कपूरची केजरिवालांना खास विनंती
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2016 04:20 PM (IST)
नवी दिल्लीः बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना अनोखी विनंती केली आहे. केजरिवालांच्या जीवनावर 'an insigneficant man' ही डॉक्यमेंट्री बनवण्यात आली आहे, ती त्यांनीही पाहावी, अशी विनंती सोनमने केली आहे. केजरिवाल यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास 'an insigneficant man' मध्ये चित्रीत करण्यात आला आहे. ही डॉक्युमेंट्री दिल्लीच्या टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग केजरिवालांनी करावं आणि ती पाहावी, अशी विनंती सोनमने केली आहे. कजरिवालांचं सिनेमाविषयीचं प्रेम जगजाहीर आहे. त्यांनी अखेरचा नीरजा हा सिनेमा पाहिला आणि आवडल्यामुळे तो दिल्लीत टॅक्स फ्री केला होता. टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सिनेमे रिलीज केले जातात.