'पॅडमॅन' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.
महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय
अक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये 'थँक्यू' या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत कारण करणार आहे.
'पॅडमॅन'चं दिग्दर्शन आर बाल्की करणार असून निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे.
नववर्षाला अक्षय कुमारने 'पॅडमॅन'चा जो लूक शेअर केला होता, तोच लूक सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे की, 'या मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनल्याने अतिशय उत्साही आहे. तसंच राधिका आपटेनेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर 'पॅडमॅन'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे.