Sonali Kulkarni : कोरोनाकाळात सोनाली कुलकर्णी  (Sonali Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) लग्नबंधनात अडकले. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर सोनालीने पुन्हा एकदा कुणालसोबत थाटामाटात लग्न केलं. आता सोनालीने चाहत्यांसोबत तिच्या दुसऱ्या वेडिंग स्टोरीची झलक शेअर केली आहे. 


सोनाली आणि कुणालने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. सोनालीने काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता तिने वेडिंग स्टोरीची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वेडिंग स्टोरीची झलक शेअर करत तिने लिहिलं आहे,"सोनाली-कुणाल (अ वेडिंग स्टोरी) पहिली झलक 8 ऑगस्टला...लवकरच...फक्त प्लॅनेट मराठी ओटीटी'वर".






सोनाली आणि कुणालच्या दुसऱ्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. सोनाली आणि कुणाल त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर कधी शेअर करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. सोनाली आणि कुणालच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा चाहत्यांना लवकरच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 


कोरोनामुळे सोनालीने घेतला लग्न करण्याचा निर्णय 


कुणाल हा सीए आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर इंडस्ट्रीतल्या बऱ्याच कलाकारांनी या दोघांना केळवणही केलं होतं. पुढे कुणाल दुबईला गेला. सोनाली चित्रिकरणात व्यग्र झाली. चित्रिकरण संपवून सोनाली मार्चमध्ये दुबईला गेली ती जुलैमध्ये होणाऱ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी. त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहून दोघांनी लग्न अलिकडे आणण्याचा निर्णय घेतला.


संबंधित बातम्या


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबद्ध! लग्न समारंभाचा खर्च कोविड मदतनिधीला देणार


Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती 14'चा आज होणार ग्रॅंड प्रीमियर; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होणार साजरा