मुंबई : कॅन्सरवरील उपचारांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे पाच महिन्यांनी अमेरिकेतून भारतात परतली आहे. सोनाली बेंद्रे सोमवारी पहाटे तीन वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. यावेळी सोनालीचा पती गोल्डी बहल तिच्यासोबत होता.


स्पेशल रिपोर्ट: आधी इरफान खान, आता सोनाली बेंद्रे!

"आता उपचार संपले असून सोनालीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु हा आजार पुन्हा उफाळू शकतो, त्यामुळे नियमित तपासणी करावी लागेल, अशी माहिती गोल्डी बहलने यावेळी दिली."

कॅन्सरवरील उपचारांनंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतणार

सोनालीने जुलै महिन्यात तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरवर उपचार घेत होती. दरम्यानच्या काळात सोनालीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. कालही सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन भारतात परतणार असल्याची माहिती दिली.

इरफान खानला न्यूरोइंडोक्राईन

"दुरावा आपल्याला खूप काही शिकवतो. घरापासून दूर राहिल्यानंतर मला हे जाणवलं की मला अनेक लोकांच्या गोष्टी समजल्या. सर्वजण आपलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न करतात. सोबतच सर्वजण संघर्षही करत आहेत. कुणीही हार मानत नाही," अशी पोस्ट सोनालीने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

कर्करोगाशी झुंज दिलेले 11 सेलिब्रेटी