दबंग गर्ल सोनाक्षीचा अॅक्शन मुव्ही अकीराचं ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 04:06 PM (IST)
मुंबई: सोनाक्षीचा बहुप्रतिक्षीत अकीराचं ट्रेलर अखेर रिलीज झालं आहे. सोनाक्षी यामध्ये मोठमोठे स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर मुरूगदास यांनी केले असून हा चित्रपट मौउना गुरु या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सप्टेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. ६ जुलै रोजी रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या सुल्तान या चित्रपटापासून अकीराचे ट्रेलर चित्रपटगृहात दाखवण्यात येणार आहे. अकीरामध्ये सोनाक्षी अॅक्शनसोबतच बोल्ड सिनमध्येही पाहायला मिळणार आहे. सोनाक्षी आपल्या भारदार अॅक्शनने चित्रपटातील हिरो टायगर श्रोफला आव्हान देत आहे. या चित्रपटात सोनाक्षी एका बंडखोर तरुणीची भूमिका निभावत आहे. यात तिचा प्रवास जोधपूर ते मुंबईपर्यंतचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.