मुंबई : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच तिच्या कथित बॉयफ्रेण्ड बंटी सचदेवसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. सोनाक्षी आणि बंटी बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि बंटी लवकरच सात फेरे घेणार आहेत.

 

सोनाक्षी सध्या तिच्या चित्रपटांचं आणि जाहिरातींचं काम आटोपण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेकरुन तिला तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष देता येईल.

 

सोनाक्षीचे जबरदस्त स्टंट, 'अकीरा'चा ट्रेलर रिलीज


 

बंटीने सोनाक्षीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सोनाक्षीने होकार दिला आहे. मात्र तिच्याकडील कामांची यादी पाहता सोनाक्षी तातडीने बोहल्यावर चढेल अशी शक्यता कमीच आहे.

 

सोनाक्षी सध्या तिच्या 'अकीरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा ए आर मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.