मुंबई : आपल्या बेसूर आवाज आणि उटपटांग गाण्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ढिन्चॅक पूजाचे यू ट्यूबवरील सर्व व्हिडीओ हटवण्यात आले आहेत.


''सेल्फी मैंने ले ली आज'' या गाण्यामुळे ढिन्चॅक पूजा चर्चेत आली. ढिन्चॅक पूजा किती प्रसिद्ध आहे, याचा अंदाज तिच्या यू ट्यूब पेजच्या सबस्क्राईबच्या आकड्यांवरुन स्पष्ट होईल. 1.8 लाख लोकांनी ढिन्चॅक पूजाचं पेज सबस्क्राईब केलं आहे. इतकंच नाही तर पेजवर 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी ढिन्चॅक पूजाची खिल्ली उडवत तिला ट्रोलदेखील केलं होतं. नुकतंच तिने "दिलों का स्कूटर" हे नवं गाणंही रिलीज केलं होतं. यानंतर हेल्मेटशिवाय स्कूटर चालवल्याने दिल्ली ट्रॅफिक पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

परंतु आता तिचे सर्व व्हिडीओ यू ट्यूबवरुन डिलीट झाले आहेत. मात्र हे कोणत्या तांत्रिक चुकीमुळे झालं की, प्रत्यक्षात गुगलने जाणीवपूर्वक तिचे व्हिडीओ डिलीट केले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, कथप्पा सिंग नावाच्या एका इसमाने तिच्या व्हिडीओंवर कॉपीराईटचा दावा केला आहे. त्यामुळे तिचे व्हिडीओ हटवल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातमी

सोशल मीडिया क्वीन 'ढिंच्यॅक पूजा'वर पोलिस कारवाई करणार