मुंबई : सोशल मीडिया स्कॅमप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा या दोघींची मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलीस सोशल मीडिया स्कॅम प्रकरणी बॉलिवूडमधील या दोन दिग्गज अभिनेत्रींची चौकशी करू शकतात. मुंबई पोलीस सोशल मीडियावर फेक घोटाळ्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी दीपिका आणि प्रियंकासोबतच जवळपास 175 हाय प्रोफाइल लोकांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी आणि चौकशी होऊ शकते.


आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरही नजर


पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलीस सोशल मीडिया स्कॅम प्रकरणी तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि सायबर सेलचं एक पथक नेमण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये मुंबई पोलीस दलातील ज्वाइंट कमिश्नर विनय कुमार चौबे यांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की, या संपूर्ण सोशल मीडिया स्कॅम प्रकरणात 54 वेगवेगळ्या कपंन्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सोशल मीडिया मार्केटिंगसाठी प्रसिद्ध असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी Followerskart.com वरही पोलिसांची नजर आहे.


पाहा व्हिडीओ : प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणची चौकशी होण्याची शक्यता



बॉलिवूड स्टार्स आणि खेळाडूंचे अकाउंट्सवर संशय


सोशल मीडिया स्कॅममध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिषेक दिनेश नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्रिमिनल इंटेलिजेंस युनिटने ही कारवाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या 175 अकाउंट्समध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स, खेळाडू आणि बिल्डर्सचा समावेश आहे.


दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा सोया दोघींना सोशल मीडियावर सर्वाधित लोक फॉलो करतात. ट्विटर आणि इन्स्टाग्राम मिळून दीपिकाचे 78 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर प्रियंका चोप्राचे 81 मिलियन फॉलोअर्स आहेत.


काय आहे प्रकरण?


बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर भूमि त्रिवेदी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये तक्रार नोंदवली होती की, तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे.तिच्या तक्रारीनंतर इंटरनॅशनल रॅकेटचा एका सदस्या अभिषेख दौडे याला अटक करण्यात आली होती. अटक केलेला आरोपी एका अशा इंटरनॅशनल रॅकेटचा सदस्य आहे, जो एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमाने बड्या लोकांचे बनावट प्रोफाईल बनवून त्यांच्याबाबत चुकीचे आकडे, परफॉर्मन्स आणि खोट्या कमेंटच्या माध्यमाने लोकांची दिशाभूल करायचा. खोटे प्रोफाईल बनवून त्यावर लाखो लाईक, व्हिव्ज आणि रिव्ह्यू कमेंट तयार करायचा, ज्यामुळे लोकांची दिशाभूल व्हायची.


क्राईम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने जेव्हा याचा तपास सुरू केला तेव्हा कळलं की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खोटे प्रोफाईल बनवून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात होती. ज्यावर लाखो लाईक आणि कमेंट येत होत्या. तर काही खोट्या पोस्ट सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे समाजामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. याच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे खोट्या प्रोफाईलच्या माध्यमाने कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींना संपर्क करण्यात आला होता. ज्यामुळं सेलिब्रिटींच्या कमेंटनंतर अशा खोट्या बातम्या अधिक जलद गतीने पसरवण्यास मदत झाली असती.


महत्त्वाच्या बातम्या : 


सेलिब्रिटीजचे अकाऊंट हॅक करुन फेक लाईक्स, फॉलोअर्स पुरवण्याचं काम, एकाला अटक