Snehal Shidam : 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. जामकर आणि देवयानीच्या एन्ट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतो आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. जामकरच्या पत्नीची आता मालिकेत एन्ट्री होणार आहे.
अभिनेत्री स्नेहल शीदम जामकरच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. जामकरच्या पत्नीच्या एन्ट्रीनंतर मालिकेला काय वळण येणार हे पाहणं रंजक ठरेल. या भूमिकेबद्दल बोलताना स्नेहल म्हणाली,"देवमाणूस ही मालिका माझी आवडती आहे. या मालिकेत एखादी भूमिका करण्याची इच्छा मला होती पण ती इच्छा आता पूर्ण होत आहे. एका महत्वपूर्ण वळणावर मालिकेत जामकरच्या पत्नीच्या भूमिकेत मी एन्ट्री करणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अशा करते."
'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.
संबंधित बातम्या