Mukta Barve:   अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. मुक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. मुक्ता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असते. सध्या मुक्ता ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मुक्तानं एका प्रसिद्ध हॉटेलच्या नावाचा उल्लेख करुन एक पोस्ट शेअर केली आहे.


मुक्ताची पोस्ट


मुक्तानं पोह्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मुक्तानं पोह्यांच्या टेस्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुक्तानं या पोस्टमध्ये प्रसिद्ध हॉटेलच्या नावाचा उल्लेख केला. "मी आज नाशिकला जाताना पडघा टोलनंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी, गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की, पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीशमध्ये कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं." असं मुक्तानं या पोस्टमध्ये लिहिलं. मुक्ताच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मुक्ता सध्या तिच्या या पोस्टमुळे चर्चेत आहे.






मुक्ताचे चित्रपट


पिंपळपान,बंधन,  आभाळमाया,श्रीयुत गंगाधर टिपरे , इंद्रधनुष्य,अग्निहोत्र  या मालिकांमध्ये मुक्तानं काम केलं. मुंबई- पुणे- मुंबई , मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पहावे करून, डबलसीट, हायवे- एक सेल्फी आरपार या मुक्ताच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  मुक्तानं अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.


मुक्ता सध्या  चारचौघी या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  'चारचौघी' या नाटकात मुक्तासोबतच रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या नाटकाच्या कथानकाचं आणि नाटकामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Mukta Barve: चिंचवडमध्ये गेलं बालपण, पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये घेतलं शिक्षण; नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या मुक्ता बर्वेबद्दल जाणून घ्या...