Salaar : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभासचा 'सालार' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिस गाजवत आहे. प्रभासच्या चाहत्यांनी 'सालार'चा फर्स्ट डे फर्स्ट शो मोफत पाहिला आहे. 200 सिनेरसिकांनी हा सिनेमा चक्क उभं राहूनच पाहिला आहे.


चाहत्यांनी मोफत पाहिला 'सालार'


प्रभासच्या 'सालार' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेरसिकांकडून या सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे. प्रभासच्या सिनेमाची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता 'सालार' या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. साऊथमधील अनेक शहरांमध्ये 'सालार'चे मध्यरात्रीदेखील शो आयोजित करण्यात आले आहेत. तेलंगनातील एका थिएटरमध्ये प्रभासचे शेकडो चाहते सिनेमागृहात घुसले आणि त्यांनी हा सिनेमा मोफत पाहिला. 200 पेक्षा अधिक लोकांनी 'सालार' हा सिनेमा मोफत पाहिला आहे.






'सालार'चा फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद


तेलंगनातील आरटीसी चोहारे येथील संध्या थिएटरमध्ये 'सालार'चा शो आयोजित करण्यात आला होता. 22 डिसेंबर 2023 रोजी रात्री 1 वाजता 'सालार'चा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरू होणार होता. थिएटरबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सिनेमा सुरू होण्याच्या पाच मिनिटे आधी सिनेमागृहाचा दरवाजा सुरू करण्यात आला. दरवाजा सुरू केल्या-केल्या शेकडो चाहते सिनेमागृहात घुसले. त्यामुळे थिएटर मॅनेजमेंटलाही काही करता आलं नाही. 200 पेक्षा अधिक चाहत्यांनी तिकीट न काढता 'सालार' हा सिनेमा पाहिला. 


तेलंगनाप्रमाणे हैदराबादमधील केपीएचबीच्या मल्लिकार्जुन थिएटरमध्येही 'सालार'च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. 200 पेक्षा अधिक लोकांनी 'सालार' हा सिनेमा मोफत पाहिला आहे. चाहत्यांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. प्रभासचा मोठा चाहतावर्ग आहे. 


'सालार' या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 90 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात सध्या 'सालार' या सिनेमाचा बोलबाला आहे. आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'चा जगभरात डंका! दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा