Singer Mika Singh And  Rakhi Sawant:  बॉलिवूड गायक मिका सिंहनं (Mika Singh)) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. अभिनेत्री राखी सावंतचं (Rakhi Sawant) बळजबरीनं चुंबन घेतल्याप्रकरणी मिका सिंहविरोधात (Singer Mika Singh) गुन्हा दाखल करण्यात आला होता.  17 वर्षे जुना हा एफआयआर रद्द करण्याची  मागणी  मिकानं याचिकेतून केली आहे. या संपूर्ण प्रकरणी राखी सावंतला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली भूमिका मांडण्याचे निर्देश  हायकोर्टानं दिले आहेत.  

Continues below advertisement

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. मिकाच्या याचिकेवर पुढील आठवड्यात पुन्हा होणार सुनावणी होणार आहे.

2006 मध्ये एका बर्थ-डे पार्टीमध्ये मिका सिंहनं राखी सावंतला किस केले होते, या पार्टी दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर मिकाला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

Continues below advertisement

मिकानं अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. मिकाच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच गंदी बात, ढोल बजाके, मौजा ही मौजा, वीर दी वेडिंग, विसल बजा 2.0, सावन मैं लग गई आग ही हिट गाणी देखील मिरानं गायली आहेत

सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rakhi Sawant-Adil Khan Durrani : राखीचा पती आदिल दुर्रानीला पोलिसांनी केली अटक