मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा 'सिमरन' आणि फरहान अख्तरचा 'लखनऊ सेंट्रल' हे दोन सिनेमे या शुक्रवारी प्रदर्शित झाले. पण दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. पण लखनऊ सेंट्रलपेक्षा सिमरनची कमाई मात्र सध्यातरी जास्त आहे.


सिमरनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत प्रमुख भुमिकेत आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं या सिनेमाच्या कमाईबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं चार दिवसात एकूण 12.06 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 2.77 कोटी तर दुसऱ्या दिवशी 3.76 कोटी, तर तिसऱ्या दिवशी 4.12 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 1.4 कोटी कमाई केली आहे.

कंगनाशिवाय या सिनेमात सोहम शाह, ईशा तिवारी पांडे, अनिशा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमाचं दिग्दर्शन हंसल मेहतानं केलं आहे.

कंगनाचा हा सिनेमा भारतात एकूण 1500 सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.