मुंबई : अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. रणवीर सिंगने 'सिम्बा' या सिनेमाचं पोस्टर लाँच केलं असून यात तो संग्राम भालेराव उर्फ सिम्बा ही मराठमोळी व्यक्तिरेखा साकारणार आहे.


रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती करण जोहर करणार आहे. सिम्बा चित्रपटात रणवीर सिंग रावडी अंदाजात दिसणार आहे. यापूर्वी अजय देवगणने साकारलेला बाजीराव सिंघम हा पोलिस प्रचंड गाजला होता.

करण जोहर, रणवीर सिंग यांनी सिम्बा सिनेमाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. पुढच्या वर्षाअखेरीस म्हणजे 28 डिसेंबर 2018 रोजी हा  सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांना त्याला रांगड्या रुपात पाहण्यासाठी आणखी वर्षभर थांबावं लागेल. अर्थातच तोपर्यंत पद्मावती रीलिज झाला असेलच!

https://twitter.com/RanveerOfficial/status/938597618497802240
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने रणवीरसोबत अॅक्शन मूव्ही करणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्यांदाच रणवीर इतक्या मोठ्या प्रमाणावर साहसदृश्यं करणार आहे.