Sidhu Moose Wala New Song Mera Na : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्दधू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'मेरा ना' (Mera Na) हे नवं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. निधनानंतर रिलीज होणारं सिद्धू मूसवाला यांचं हे तिसरं गाणं आहे. याआधी त्यांची 'वॉर' आणि 'SYL' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.


सिद्धू मूसेवालाचा यांचा मोठा चाहतावर्ग आहे. निधनानंतरही त्याच्या गाण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्याचं 'मेरा ना' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या गाण्याला मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. रिलीजच्या 10 मिनिटांत या गाण्याला 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


'मेरा ना' गाण्याला मिळाले रेकॉर्डब्रेक व्ह्यूज


सिद्धू मूसेवाला यांचं 'मेरा ना' हे गाणं ग्रॅमी पुरस्कार विजेते नाइजीरियन रॅपरने गायलं आहे. 'मेरा ना' या गाण्याला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. लेजेंड्स कायम जिवंत राहतात, ब्रो तुमची आठवण येत आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. आता सिद्धू मूसेवाला यांचं नवं गाणं कोणतं रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


5 ते 6 महिन्यांनी सिद्धू मूसेवालाचा यांचं एक गाणं रिलीज होणार!


सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणं रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे 'SYL' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. दोन दिवसांतच या गाण्याला 27 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर 33 लाख लोकांनी सिद्धूच्या या गाण्याला आपली पसंती दर्शवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड करत होतं.  



संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala Song: सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!