Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या निधनानंतर त्यांचे 'SYL' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अल्पावधितच हे गाणं सिद्धूच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. पण आता सिद्धूचे हे गाणं यूट्यूबने हटवलं आहे. 


सिद्धू मूसेवालाचे 'SYL' हे गाणं प्रेक्षकांना आता यूट्यूबवर पाहू शकत नाहीत. सरकारने आक्षेप घेल्यामुळे हे गाणं यूट्यूबने हटवलं, असे म्हटले जात आहे. सिद्धू मूसेवालाच्या या गाण्यात शेतकरी आंदोलन, लाल किल्ला आणि पंजाब-हरियाणा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होता. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 






सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे 'SYL' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. दोन दिवसांतच या गाण्याला 27 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर 33 लाख लोकांनी सिद्धूच्या या गाण्याला आपली पसंती दर्शवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड करत होतं. 


दर 5 ते 6 महिन्यांनी एक गाणं रिलीज होणार!


सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणं रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala Song: सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!


Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी मनकिरत औलखला क्लीन चिट, पुराव्यांअभावी गायकाची सुटका!