Kiara Advani - Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आयुष्यभरासाठी सिद्धार्थची जोडीदार होण्यास कियारा सज्ज आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. लग्न सोहळ्याच्या ठिकाणापासून ते लग्नात कोण कोण पाहुणे असतील अशा सर्वच गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सिद्धार्थ-कियारा जैसलमेरमध्ये अडकणार लग्नबंधनात
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी येत्या 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ महलात सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 100 ते 125 पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
कियाराचा ब्रायडल लेहेंगा!
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित राहणार आहेत. पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी खास 84 आलिशान खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. जैसलमेरमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नसोहळ्यात कियारा मनीष मल्होत्राने डिझाईन केलाला ब्रायडल लेहेंगा परिधान करणार आहे.
पंजाबी रितीरिवाजानुसार करणार लग्न
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. आजपासून (4 फेब्रुवारी) त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात होणार आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची प्रत्येक माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पापाराझी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत.
सेलिब्रिटी आर्टिस्ट वीणा नागडा कियाराच्या हातावर मेहंदी काढणार
सेलिब्रिटी आर्टिस्ट वीणा नागडा कियारा आडवाणीच्या हातावर मेहंदी काढली आहे. वीणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 'राजस्थान कॉलिंग' असं म्हणत तिने विमानतळावरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वीणाने याआधी मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी आणि सून श्लोका मेहता यांच्या हातावर मेहंदी काढली आहे. तसेच एका जाहिरातीदरम्यान तिने कियासासोबत काम केलं आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या हातावर वीणाने मेहंदी काढली आहे.
कियारा-सिद्धार्थचे आगामी प्रोजेक्ट
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने 2021 साली 'शेरशाह' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमातदेखील त्यांनी एकत्र काम केलं आहे. सिद्धार्थचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे कियाराच्या 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :