Siddharth Jadhav First Earnings : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) अर्थात 'आपला सिद्धू' आज मराठी मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडदेखील गाजवत आहे. आज त्याचा मोठा चाहतावर्ग असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सिद्धार्थचा 'अफलातून' (Aflatoon) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई किती? (Siddharth Jadhav First Earnings)


नाटक आणि सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई काहीशे रुपये होती. नुकतचं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याबद्दल भाष्य केलं आहे. तो म्हणाला,"शाळेत असताना अंध-मित्र आणि मैत्रिणींसाठी मी पेपर लिहायला जायचो. त्यावेळी मला 500-1000 रुपयांचा पहिला चेक मिळाला होता. पण याला मी माझी पहिली कमाई म्हणणार नाही". 






सिद्धार्थ पुढे म्हणाला,"कॉलेजमध्ये असताना एकांकिकेत काम करायला सुरुवात केली. पुढे अभिनयाची गोडी लागल्याने याच क्षेत्रात काम करत राहिलो. दरम्यान 'तुमचा मुलगा करतो काय' हे व्यावसायिक नाटक मला मिळालं. या नाटकाची नाईट दोनशे रुपये होती. त्यामुळे दोनशे रुपये ही माझी पहिली कमाई आहे. पहिल्या कमाईचे पैसे मी आईला दिले होते". 


सिद्धार्थने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच रंगभूमीदेखील त्याने गाजवली आहे. सुपरस्टार सिद्धार्थ जाधवने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 


सिद्धार्थ जाधवबद्दल जाणून घ्या... (Siddharth Jadhav Movies)


कॉलेजमध्ये असताना एकांकिकेंच्या माध्यमातून अभिनयप्रवासाची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थने अगं बाई अरेच्चा. जत्रा, साडे माडे तीन, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच जागो मोहन प्यारे, तुमचा मुलगा करतोय काय, लोच्या झाला रे आणि गेला उडत या नाटकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. सिद्धार्थचा 'अफलातून' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तीन डिटेक्टिव्ह मित्रांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 21 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.


संबंधित बातम्या


Aflatoon: 'अफलातून' चा धमाकेदार टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस