Stree 2 Box Office Collection Day 32 :   बॉक्स ऑफिसला  'स्त्री-2' (Stree-2) मधील 'सरकटा'ने चांगलेच झपाटून सोडले आहे. स्त्री-2 ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. स्त्री-2 ने आता तिकीटबारीवर दुसऱ्या महिन्यात एन्ट्री घेतली आहे. चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 


थिएटरमध्ये रिलीज होऊन 'स्त्री-2' चित्रपटाला 32 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने रजनीकांत, शाहरुख खान, सलमान-आमिर यासारख्या मोठ्या कलाकारांचे चित्रपटांचेही विक्रम मोडीत काढले आहेत.


32 व्या दिवशी 'स्त्री-2'ची कमाई किती?


सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार, स्त्री-2ने  रविवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत 7 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने रिलीजच्या 31 व्या दिवशी  5.4 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे रविवारच्या कमाईचा आकडा चांगला असल्याचा अंदाज आहे. 


प्राथमिक अंदाजानुसार, चित्रपटाने आतापर्यंत 555.10  कोटींची कमाई केली. हे सुरुवातीचे आकडे असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. 






'स्त्री-2' ने पाचव्या विकेंडला रचले विक्रम...


'स्त्री 2' या आठवड्याच्या शेवटी 12.4 कोटींची कमाई करून पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. या चित्रपटाने बाहुबली (11.78), तानाजी (10.41 कोटी), केजीएफ चॅप्टर 2 (10.25), 3 इडियट्स (9.6), जवान (9.47), दृश्यम (8.98), दंगल (8.95), पठाण (8.45), भूल भुलैयाला मागे टाकले. 2 (8.18), बधाई हो (8) आणि पद्मावत (7.54) या चित्रपटांना मागे सारले आहे. 


Sacknilk नुसार, वर उल्लेख केलेल्या चित्रपटांची पाचव्या आठवड्याची ही एकूण कमाई आहे. तर 'स्त्री 2' ने पाचव्या आठवड्यातील अवघ्या दोन दिवसांत इतकी कमाई केली आहे. 'स्त्री-2' हा कमाईच्या बाबतीत 'बाहुबली 2' (11.78) चा विक्रमही मोडण्याची शक्यता आहे.  


'द बकिंघम मर्डर्स' चा स्त्री-2 वर काहीच परिणाम नाही...


करीना कपूरचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स' रिलीज झाला आहे. मात्र, स्त्री-2 वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. करीनाच्या चित्रपटाने तीन दिवसात 4 कोटींची कमाई केली. तर, स्त्री-2 ने यापेक्षा अधिक कमाई केली आहे. 






'स्त्री 2'ची देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाई 600 कोटींपर्यंत पोहोचणार आहे, तर दुसरीकडे चित्रपटाची वर्ल्डवाइड कमाई 800 कोटींचा आकडा पार करणार  असल्याचा अंदाज आहे.