‘हाफ गर्लफ्रेण्ड’च्या शूटिंगवेळी श्रद्धा कपूर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2016 02:51 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. शूटिंग सुरु असताना श्रद्धाचा पाय मुरगळला. श्रद्धाने स्वत: याबाबत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन माहिती दिली. श्रद्धा कपूर सध्या चेतन भरत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ कादंबरीवरील सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच श्रद्धाचा पाय मुरगळला. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोनुसार श्रद्धाच्या पायाला निळ्या रंगाची पट्टी बांधण्यात आली आहे. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन, त्याखाली लिहिलंय, “पाय मुरगळला असला, तरी बास्केटबॉल कोर्टवर धावताना खूप मजा आली. ##HalfGirlfriend”