कोल्हापूर: सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना सहनुभूती दाखवल्याबद्दल त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सलमानला पाकिस्तानात जावं, असा सल्ला दिल्यानंतर, शिवसेनेनेही सलमानवर टीकेची झोड उठवली आहे. सलीम खान यांनी आपल्या मुलाला घरात कोंडावं तो काहीही बोलत असतो, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे.

सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहनुभूती दाखवताना, ''ते कलाकार आहेत, दहशतवादी नव्हेत. सरकार त्यांना परवानगी आणि व्हिसा देते. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेलेले दहशतवादी होते. हे कलाकार आहेत, सरकार कलाकारांना वर्क परमीट देते,'' अशी प्रतिक्रीया दिली होती.

त्यावर शिवसेनेने चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ''सलमान खान काहीही बोलत आहे. त्यामुळे सलीम खान यांनी त्याला घरात कोंडून ठेवावं,'' असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे सलमानच्या पाकिस्तानी कलाकारांना सहनुभूती दाखवण्यावरुन बॉलिवूडमध्ये उभी फूट पडली आहे. सलमानच्या वक्तव्याचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी समर्शन केले आहे, तर  सुहेल सेठ यांनी सलमानच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी कलाकार व्हिसाच्या आधारे देशात येत असले, तरी त्यांचे काही दहशतवादीही व्हिसाचाच आधार घेऊन भारतात येतात. व्हिजाच्या आधारे त्यांचे कसलेही चाळे खपवून घेऊ नयेत, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो सलमानच्या 'त्या' वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट 

सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात

अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध!