Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) आता 'प्रेम प्रथा धुमशान' (Prem Pratha Dhumshaan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


दसऱ्याच्या मुहूर्तावर टीझर लॉंच


'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिजित वारंग सांभाळणार आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमाच्या माध्यमातून मालवणी बोलीत एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. 






मालवणी बोलीभाषेतला 'प्रेम प्रथा धुमशान'


'प्रेम प्रथा धुमशान' हा सिनेमा मालवणी बोलीभाषेतला आहे. मालवणी बोलीचा वापर सिनेमांत बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले सिनेमे अगदी मोजके आहेत. मात्र मालवणी बोलीला, तिथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जात अभिजित वारंगने 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमाच्या माध्यमातून अनोखी प्रेमकथा मांडली आहे. 


शिवाली परब महत्त्वाच्या भूमिकेत


शिवाली परब या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवालीसह या सिनेमात विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Siddharth Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी 'बिग बॉस'च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया


Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!