अजयचा 'शिव' अवतार, 'शिवाय'चं पहिलं गाणं रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2016 05:54 PM (IST)
मुंबईः अजय देवगनचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय'मधील 'बोलो हर हर' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अजय देवगनचा या गाण्यात शिव अवतार पाहायला मिळत आहे. या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. यापूर्वी ट्रेलरमधील अजयच्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांना वेड लावलं होतं. त्यानंतर आता 'बोलो हर हर' हे गाणं चाहत्यांच्या चांगलच पसंतीस उतरलं असल्याचं चित्र आहे. प्रसिद्ध गायक मोहित चव्हाण आणि बादशाह यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. पाहा गाण्याचा व्हिडिओ https://twitter.com/ShivaayTheFilm/status/774831354471182338 शिवाय येत्या दिवाळीला म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगन अभिनित आणि दिग्दर्शित या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस जोरदार वाढत आहे.