मुंबईः बहुचर्चित 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. त्यासोबतच अजय देवगनच्या 'शिवाय'ला देखील चांगली ओपनिंग मिळाली.


'ऐ दिल है मुश्किल'ने पहिल्या दिवशी भारतात 13.30 कोटींची कमाई केली. तर सिंगल स्क्रीनवर पहिल्या दिवशी 'शिवाय'चं वर्चस्व पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी सिनेमाने 10.20 कोटींची कमाई केली.

https://twitter.com/taran_adarsh/status/792249744894595072

धनतेरसच्या दिवशी लोक कामात व्यस्त असतात. मात्र तरीही एवढी कमाई ही मोठी गोष्ट मानली जात आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/792279953408598016

करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची मुख्य भूमिका आहे.

सिंगल स्क्रीनवर 'शिवाय'चं वर्चस्व

'शिवाय'मध्ये दिग्दर्शन आणि अभिनय अजय देवगनने केला आहे. 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशनने हा सिनेमा रिलीज करणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र तोडगा निघाल्यानंतर हा सिनेमा रिलीज करण्यात आला.

तरी देखील सिंगल स्क्रीनवर 'शिवाय'ने बाजी मारली. त्यामुळे निश्चितच 'ऐ दिल है मुश्किल'ला सिंगल स्क्रीनवर प्राधान्य दिलं नसल्याचं चित्र आहे. शनिवार आणि रविवारी मिळून दोन्ही सिनेमे चांगली कमाई करतील, असा अंदाज लावला जात आहे.