Sukhee : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'सुखी' असे या सिनेमाचे नाव आहे. शिल्पाने सोशल मीडियावर 'सुखी' सिनेमाचे पोस्टर शेअर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


पोस्टरमध्ये शिल्पाने हातात पाकीट, घड्याळासह काही घरगूती गोष्टी पकडल्या आहेत. पोस्टरवरुन 'सुखी' हा स्त्रीप्रधान सिनेमा असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात शिल्पा मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





'सुखी' सिनेमाचे दिग्दर्शन सोनल जोशीने केले आहे. तर गुलशन कुमार, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. गेले अनेक दिवस शिल्पा शेट्टी चर्चेत होती. पण ती तिच्या सिनेमांमुळे चर्चेत नसून पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होती. 


संबंधित बातम्या


Clean OTT : महिलांना समर्पित जगातील एकमेव  OTT प्लॅटफॉर्म होणार लॉंच! जाणून घ्या


Web Series Releasing March : अजय देवगणची ‘रुद्रा’ ते विद्या बालनची ‘जलसा’, मार्च महिन्यात ओटीटीववर मनोरंजनाची धूम!


Gangubai Kathaiwadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha