Sheezan Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवर गळफास घेत तिने आयुष्य संपवलं आहे. कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानच्या (Sheezan Khan) त्रासाला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. 


शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 


शिझान खान सध्या तुनिषासह 'अली बाबा दास्तान ए काबुल' (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत होता. शिझान आणि तुनिषा रिलेशनमध्ये होते. पण काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. शिझानने तुनिषासोबत लग्न करायला नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं जात आहे. 






शिझान खानने सोशल मीडियावर तुनिषासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. शिझानने अभिनयासह त्याच्या फिटनिसकडे लक्ष दिलं आहे. सोशल मीडियावर तो अनेकदा वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करतो. शिझान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 


शिझान आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. तुनिषा आणि शिझानची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. शिझान खान हा अभिनेत्री फलक नाझचा छोटा भाऊ आहे. तुनिषाने शिझान खानच्याच मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. 


संबंधित बातम्या


Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात दाखल