Sheezan Khan On Tunisha Sharma Suicide Case : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) तुरुंगातून सुटका झाली आहे. 70 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझान खान म्हणाला,"आज तुनिषा असती तर माझ्यासाठी लढली असती, तिची खूप आठवण येत आहे".
आज स्वातंत्र्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला : शिझान खान
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिझान खान म्हणाला,"आज खऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळला आहे. आज मी स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा माझ्या आईला आणि बहिणीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पण आता मी माझ्या हक्काच्या माणसांसोबत असल्याचं मला समाधान आहे".
शिझान खानला कुटुंबियांसोबत वेळ घालवायचाय
शिझान खान पुढे म्हणाला,"मी आता माझ्या कुटुंबियांसोबत आहे. माझ्या हक्काच्या माणसांसोबत मला आता वेळ घालवायचा आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं आहे. तिने बनवलेल्या घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. शूटिंगमुळे भावंडांसोबत वेळ घालवता येत नव्हता. आता त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे".
तुनिषाबद्दल शिझान म्हणाला,"मला तुनिषाची खूप आठवण येत आहे. ती जिवंत असती तर आज माझ्यासाठी लढली असती". तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खान गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषाने 'अलीबाबा दास्तान : ए काबुल' (Ali Baba : Dastaan-e-Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूला शिझान जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता.
तुनिषाच्या आईने केलेल्या आरोपांची दखल घेत शिझानला 25 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हापासून शिझानचे कुटुंबीय त्याच्या जामिनाच्या प्रतिक्षेत होते. अखेर याप्रकरणी शिझानला आता दिलासा मिळाला आहे. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते. तुनिषा आणि शिझान 'अलीबाबा दास्तान : ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणांनी त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर ब्रेकअपच्या 15 दिवसांनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं.
संबंधित बातम्या