Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मितानं सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दल माहिती दिली होती. 'मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली.' असं सुष्मितानं पोस्टमध्ये लिहिलं होतं. आता सुष्मितानं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सुष्मितानं या पोस्टच्या माध्यमातून तिच्या हेल्थबाबत अपडेट देखील दिली आहे. 


सुष्मिताची पोस्ट


सुष्मिता सेननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली. या व्हिडीओमध्ये सुष्मिता म्हणते, 'मी गंभीर हृदयविकाराच्या झटक्यातून सावरले आहे. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होते. ती माझ्या आयुष्यातील एक फेज होती. माझ्या मनात आता भीती नाहीये.' व्हिडीओच्या माध्यमातून सुष्मितानं नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे देखील अभार मानले आहेत. तसेच ज्या चाहत्यांना सुष्मितासाठी फुलं पाठवली. त्यांचे देखील तिनं आभार मानले. याबद्दल ती म्हणाली, 'माझं घर गार्डन ऑफ ईडन सारखं दिसत आहे.' सुष्मितानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. सुष्मिताच्या या व्हिडीओला जवळपास 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ: 






सुष्मिताचे चित्रपट


सुष्मिता सेननं बीवी नंबर 1, डू नॉट डिस्टर्ब, मैं हूं ना, मैने प्यार क्यूं किया, तुमको ना भूल पायेंगे आणि नो प्रॉब्लेम यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. तिच्या आर्या या वेब सीरिजमधील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या वेब सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता ती 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुष्मिता ही ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant)  यांची भूमिका साकारत आहे. सुष्मिताच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील लूकचा फोटो देखील सुष्मितानं सोशल मीडिया शेअर केला होता. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप