आधी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि नंतर ‘हे राम..नथुराम...’ असा 20 वर्षांचा नाटकाचा प्रवास आहे. गेल्या वीस वर्षात नाटकाला प्रेक्षकांनीही गर्दी केली. मात्र त्याचवेळी वादांनीही घेरलं. सुरुवातीपासूनच हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
नाटक बंद करण्याचे कारण सांगातना शरद पोंक्षे म्हणाले, “नाटक बंद करण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वय. नथुराम फासावर चढला तेव्हा त्याचे वय 39 होते आणि माझे वय आता 52 आहे. मी वयाच्या 52 वर्षांपर्यंत नथुरामची भूमिका खेचली. प्रेक्षकांवर एकप्रकारे लादली.”
या नाटकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीली. शिवाय, त्यांनी एबीपी माझाशी दिलखुलास गप्पाही मारल्या.
शरद पोंक्षे यांची मुलाखत :