Ravrambha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ (Ravrambha) या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे  (Shantanu Moghe)  हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येत आहे.  ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टरप्रदर्शित झाले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्द्दल अभिनेता शंतनू मोघेनं सांगितलं, की ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य आणि थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळत आहे. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते. 


'मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद' अशी भावनी अभिनेता शंतनू मोघेनं व्यक्त केला आहे.


‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक,  रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. व्हिएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनी संकलन दिनेश उच्चील यांचे आहे.


शंतनू मोघेनं चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम



स्वराज्य जननी जिजामाता आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये शांतनू मोघेनं काम केलं. तसेच त्यानं कॅरी ऑन मराठा आणि शूर आम्ही सरदार या चित्रपटांमध्ये देखील त्यानं प्रमुख भूमिका साकारली. 


महत्वाच्या इतर बातम्या :  


Dharmendra: ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला धर्मेंद्र यांनी दिलं सडेतोड उत्तर; म्हणाले, 'सगळे स्ट्रगल करत आहेत...'