Ranbir Kapoor Shamshera First Look : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय 'रणबीर कपूर'चा आज वाढदिवस आहे. रणबीरचे चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशात शमशेराच्या निर्मात्यांनी शमशेरा चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. चित्रपटाचा हा पहिला लूक शेअर करत निर्मात्यांनी रणबीरला वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. 18 मार्च 2022 मध्ये हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. 


रणबीरच्या या पहिल्या लूकला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तो या लूकमध्ये खूपच शानदार दिसत आहे. त्याच्या कपाळावर एक निशानदेखील दिसून येत आहे. रणबीरचा हा लूक चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. या पोस्टरमध्ये एक टॅगलाईन दिसून येत आहे. त्यावर लिहिले आहे. 'A Legeng Will Rise' या अॅक्शन सिनेमात रणबीर वाणी कपूरसोबत दिसून येणार आहे. वाणी कपूर म्हणाली,  "शमशेरा चित्रपट हा 1993 साली प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या गाजलेल्या 'खलनायक' चित्रपटाची आठवण करुन देतो". 


वाणी पुढे म्हणाले, "आम्ही असेच मोठे चित्रपट बघत मोठे झाले आहोत. हा सिनेमादेखील वेगळ्या ठंगाचा आहे. मला करण जोहरचाअग्निपथ सिनेमादेखील प्रचंड आवडला होता. रणबीर एक अभ्यासू अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करताना बरेच शिकायला मिळत असते". 


रणबीर सध्या त्याची गलफ्रेंड आलिया सोबत जोधपूरमध्ये आहे. दोघेही त्यांच्या लग्नस्थळी पोहोचले आहेत असे समजले जात आहे. रणबीरने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, 'That intensity in his eyes' त्यावर चाहते त्याला वाढदिवसांच्या शुभेच्छांसह सिनेमासाठी शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. पहिला लूक पाहिल्यानंतर सिनेमा बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


शमशेरा चित्रपटाचे शुटिंगदेखील पुर्ण झाले आहे. रणबीरच्या या लुकमध्ये तो प्रचंड रागात दिसून येतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्याह दिसून येत आहे. चित्रपटात त्याचे केसदेखील मोठे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट यशराज फिल्मसने बनविलेला आहे. आज रणबीरचा 39 वा वाढदिवस आहे. मागील वर्षी त्याने त्याचा वाढदिवस त्याच्या घरच्यांसोबत साजरा केला होता. पण यंदा मात्र तो जोधपूरमध्ये आलियासोबत साजरा करतो आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आलिया आणिरणबीरचे लग्न लांबणीवर गेले आहे. पण लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.