Little Things' Season 4: ओ़टीटी प्लॅटफॉमर्सवर काही वेबसीरीज प्रचंड गाजतात. त्यात 'लिटल थिंग्स'ची गोष्टच वेगळी आहे. ही वेवसीरीज कितीही वेळा पाहिली तरी प्रेक्षक कंटाळत नाहीत. या वेबसीरीजचे कथानक काही जगावेगळे नाही. साधा, सोपा विषय. दररोज घडणाऱ्या लहानसहान गोष्टी आणि त्या गोष्टींत दडलेले प्रेम. अशा छोट्या गोष्टींत लपलेलं प्रेम शोधण्याचा प्रयत्न सीरीजमधून करण्यात आला आहे. लिटल थिंग्समध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल मुख्य भूमिकेत दिसतील. 


मिथिला त्यात काव्याची भूमिका साकारणार आहे तर ध्रुवची भूमिका ध्रुव्र सहगल साकारणार आहे. 'लिटल थिंग्स'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, त्यांच्या या लाडक्या सीरीजचा ऑफिशिअल ट्रेलर यूट्यूवर प्रदर्शित झालेला आहे. लवकरच ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. 


'लिटल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन 
आतापर्यंत  'लिटल थिंग्स'चे तीन सीजन प्रदर्शित झाले आहेत. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. पण 'लिटिल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 


मिथिला आणि ध्रुव आहेत उत्सुक
'लिटल थिंग्स'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारे मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल या चौथ्या सीजनला घेऊन खूप उत्सुक आहेत. या सीरीजमुळेच त्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या भूमिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. ही सीरीज दोघांच्याही जवळची आहे. दोघेही चौथ्या सीजनसाठी उत्सुक असले तरी हा शेवटचा सीजन असल्याचे कळल्यानंतर नाराज झाले आहेत. आता चौथा सीजन प्रदर्शित झाल्यानंतरच त्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळणार हे कळेल. आधीच्या सीजनवर चाहत्यांनी ज्या पद्धतीने प्रेम केले त्याचप्रकारे या सीजनवर देखील करतील अशी मिथिला आणि ध्रुवला आशा आहे. 


 



सणासुदीला ओटीटी प्लॅटफॉर्म सजणार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे सिनेमे आणि वेब सीरीज सणासुदीच्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सरदार ऊधम सिंह',  'डिबुक','रश्मि रॉकेट', 'लिटल थिंग्स सीजन 4' अशी या सिनेमांची आणि वेबसीरीजची नावे आहेत.