Shahrukh Khan : देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 






करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. पण कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाली आहे. किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.


'या' कलाकारांनी करण जोहरच्या बर्थडे पार्टी लावली होती हजेरी


अनन्या पांडे, फराह खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, ह्रतिक रोशन, जुही चावला,विकी कौशल, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी, करीना कपूर,कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर,शाहरुख खान आणि मलयाका आरोरा यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. 


शाहरुखचे आगामी सिनेमे


'झिरो' सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. या सिनेमात शाहरुख सोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ दिसून आल्या होत्या. शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबतदेखील शाहरुख एक सिनेमा करत आहे. शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. शाहरुखचा 'जवान' सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


संबंधित बातम्या


Karan Johar birthday Party : करण जोहरची बर्थडे पार्टी कोविड स्प्रेडर? 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग


 


Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं...'