Shahrukh Khan Launch Abram : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आपला लेक आर्यन खान (Aaryan Khan) याला लाँच केले होते. त्याची लाडकी लेक सुहाना खानसोबतही शाहरुख खान झळकणार आहे. शाहरुखने आता आपला तिसरा लेक अबराम याला देखील सिनेसृष्टीत लाँच केले आहे. मात्र, अबरामची भूमिका ही पडद्यावर नसून पडद्यामागे आहे. आर्यन खान याने सिनेसृष्टीत 'मुसाफा' या चित्रपटासाठी व्हाईस ओव्हर देत पदार्पण केले होते. त्यानंतर अबराम हा मुसाफा-2 च्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.


दिग्दर्शक बॅरी जेनकिंस यांच्या 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट 20 सप्टेंबर 2024 मध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अबराम आता सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. 


 जंगलाचा शेवटचा राजा 'मुफासा: द लायन किंग'चा वारसा जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी मुफासाच्या दुसऱ्या भागासाठी आपला आवाज दिला आहे. यामध्ये शाहरुख खानचाही समावेश आहे. त्याशिवाय, शाहरुख सोबत आर्यन, अबरामही असणार आहेत.  


2019 मधील या 'लाइव्ह-ॲक्शन द लायन किंग'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर, शाहरुख खान पुन्हा 'मुफासा' म्हणून परतला आहे आणि प्रेक्षकांना जंगलाच्या शेवटच्या राजाच्या उत्पत्तीकडे घेऊन जात आहे. त्याच्यासोबत त्याचा छावा, आर्यन सिम्बा आणि अब्राम तरुण मुफासा म्हणून सहभागी झाला आहे. या तिघांचेही आवाज चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात, त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. 


शाहरुख खानने म्हटले की, "मुफासाकडे अविश्वसनीय वारसा आहे आणि तो जंगलाचा सर्वोत्तम राजा आहे, जो त्याचे ज्ञान त्याच्या मुलाला सिम्बाला देतो. एक वडील म्हणून मी त्याच्याशी मनापासून जोडलो गेलो आहे. चित्रपटातील मुफासाचा प्रवास मला आवडतो. माझ्यासाठी डिस्नेचे नाते झाले आहे. माझी मुले आर्यन आणि अबराम आता या प्रवासाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासोबत हा अनुभव शेअर करणे खरोखरच आहे असेही शाहरुख खानने म्हटले. 


पाहा ट्रेलर : Mufasa: The Lion King | Hindi Trailer | Shahrukh Khan, Aryan Khan, AbRam Khan | In Cinemas Dec 20