Shahrukh khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा  (Shahrukh khan) आज (2 नोव्हेंबर) 57 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री चाहत्यांनी त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर गर्दी केली. शाहरुखच्या अनेक चाहत्यांबाबत तुम्ही ऐकलं असेल पण आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात एका अशा जोडप्याबाबत ज्यांनी त्यांच्या मुलांची नावं  शाहरुखच्या मुलांच्या नावाप्रमाणेच आर्यन (Aryan Khan) , सुहाना  (Suhana Khan)  आणि अबराम (Abram Khan) अशी ठेवली आहेत. 


शहनाज आणि रईस आहेत शाहरुखचे चाहते


शहनाज आणि रईस यांनी एबीपी न्यूजसोबत नुकताच संवाद साधला. यावेळी  शहनाजने सांगितले की,  ती शाहरुखची इतकी मोठी फॅन आहे की 1997 मध्ये ती शाहरुखला मुंबईत भेटण्यासाठी लखनौमधील तिच्या घरातून पळून गेली होती. शहनाजचा पती रईसने सांगितले की, शहनाजसोबत लग्न करण्याआधी शाहरुखची सिग्नेचर पोज शहनाज आणि तिच्या कुटुंबासमोर करत होता. 


रईस आणि शहनाज यांनी आर्यन, सुहाना आणि अबराम या तिघांच्या नावाचे आधारकार्ड देखील दाखवले. आपल्या मुलांची नावं शाहरुखच्या मुलांप्रमाणे असल्यामुळे आनंद वाटतो, असं एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना शहनाज आणि रईसने सांगितलं.


शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. तसेच शाहरुख खान याच्या 'मन्नत' घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शाहरुख खान स्वतः घराच्या गेटवर येत सर्वांचे शुभेच्छा स्वीकार करत असल्याचं दिसला. तसेच शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला. 


शाहरुखचे आगामी चित्रपट


शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाबरोबरच शाहरुखचा  जवान हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2 जून 2023 रोजी जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे.  शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


काही दिवसांपूर्वी शाहरुख ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याने सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ केला. व्यक्तिरेखा लहान असली तरी शाहरुखनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. काही नेटकऱ्यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर केला होता. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Pathaan Teaser: शाहरुख आणि जॉनचा खास लूक तर दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज; पठाणचा जबरदस्त टीझर रिलीज