Shahrukh Khan Daughter Suhana Khan :  बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची (Shahrukh Khan) लेक सुहाना (Suhana Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुहानाने नुकतेच अभिनयात पदार्पण केले.  ‘द आर्चीज’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या पदार्पणातील चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत सुहानाने मोठा निर्णय घेतला आहे. सुहानाने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मानधनातून गुंतवणूक केली आहे. सुहाना खानने शेत जमीन खरेदी केली आहे. एका वृत्तानुसार, सुहाना खानने 78,361 चौफूट जमीन खरेदी केली आहे. 


किती रुपयामध्ये आणि कुठं खरेदी केली मालमत्ता?


IndexTap.com ने शेअर केलेल्या कागदपत्रांनुसार, सुहानाने रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सुमारे 9.50 कोटी रुपयांची 78,361 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. या वृत्तानुसार,  सुहाना खानने 13 फेब्रुवारी रोजी 57 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहेत.






अलिबागमध्ये याआधीच आहे एक मालमत्ता


सुहानाने स्थावर मालमत्तेत पहिल्यांदाच गुंतवणूक केली नाही. 'मनी कंट्रोल'च्या वृत्तानुसार, सुहानाने जून 2023 मध्ये अलिबागमध्ये 1.5 एकर क्षेत्रफळ असलेली शेतजमीन 12.91 कोटी रुपयांना खरेदी केली होती. शाहरुख खाननेदेखील अलिबागमध्ये जमीन खरेदी केलेली आहे. त्यानंतर त्याची लेक सुहाना खानने ही अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे.






'द आर्चिज' मधून पदार्पण


सुहाना खानने अलीकडेच अभिनय आणि गायनात पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी 7 डिसेंबरला त्याचा 'द आर्चीज' हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जोया अख्तरने दिग्दर्शित केला होता आणि त्यात सुहानाने वेरोनिकाची भूमिका साकारली होती. सुहाना व्यावसायिक गायिका नाही. मात्र, पटकथेच्या मागणीमुळे त्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्याचे पहिले गाणे रेकॉर्ड करावे लागले.


इतर संबंधित बातम्या :