Amitabh Bachchan to rekha : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. या कलाकारांची लाईफस्टाईल, त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या, घरे हे सर्व अतिशय आलिशन असते. बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या घराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल 


अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला 
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईमध्ये जलसा, प्रतीक्षा आणि जनक हे बंगले आहेत.  एका रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याची किंमत 122 कोटी रूपये आहे, अमिताभ हे त्यांच्या कुटुंबासोबत या बंगल्यामध्ये राहतात.  प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी जलसा हा बंगला अमिताभ यांना 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाचा मोबदला म्हणून भेट दिला होता. त्यानंतर अमिताभ यांनी हा बंगला त्यांच्याकडून विकत घेतला होता.


शाहरूखचा मन्नत बंगला
अभिनेता शाहरूख खानचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या बंगल्याची गोष्ट हटके आणि खास आहे.  1997 मध्ये यस बॉस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदाच शाहरूखने मन्नत बंगल्याला पाहिले. त्यावेळी शाहरूखने हा बंगला खरेदी करायचे ठरवले. त्यावेळी नरीमन दुबास यांचा  हे बंगल्याचे मालक होते. त्याचे नाव  व्हिला विएना असे होते.  2001 मध्ये शाहरूख व्हिला विएनाचे मालक नरीमन दुबास यांना भेटला. त्यानंतर तो बंगला त्याने खरेदी केला. शाहरूखने या बंगल्याचे नाव जन्नत ठेवण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसानंतर या बंगल्याचे नाव मन्नत असे ठेवण्यात आले. त्यावेळी 13.32 कोटी रूपयांना हा बंगला शाहरूखने खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत 200 कोटी झाली आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. मन्नत बंगल्याचे इंटेरिअर शाहरूखची पत्नी गौरी खानने केले आहे. 
 


शिल्पा शेट्टीचा बंगला
बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुंबईतील जुहू येथे  किनारा नावाचा आलिशान बंगला आहे. एका रिपोर्टनुसार  शिल्पाच्या बंगल्याची किंमत 93 कोटी रूपये आहे. 


अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याची किंमत 102 कोटी रूपये आहे.  


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या घराची किंमत  87 करोड आहे. रिपोर्टनुसार,  अक्षय याच घराच्या परिसरात चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी येत होते आणि तो आता या घराचा मालक आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि Abhijit Bichukale चा 'बिग बॉस'मध्ये दिसणार जलवा


Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू