Shehnaaz Gill Trend On Social Media : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती आंतरराष्ट्रीय स्टार टॉम अॅलिससोबत 'ल्युसिफर'च्या पोस्टरमध्ये दिसत आहे. या पोस्टरवर शहनाज गिलला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या पोस्टरमुळे शहनाज गिल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
शहनाज गिल खरच हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार का?, नेटफ्लिक्सच्या आगामी वेबसीरिजचा शहनाज भाग असणार आहे का? बिग बॉसमध्ये शहनाज एन्ट्री करणार का? असे अनेक प्रश्न चाहते शहनाजला विचारत आहेत. या पोस्टरमुळे शहनाज सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली आहे. तसेच चाहते तिला आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छादेखील देत आहेत.
पोस्टर शेअर करत शहनाज गिलने गंमतीदार कॅप्शनदेखील लिहिले आहे. शहनाजने लिहिले आहे,"असली बिग बॉस तो यहां है". शहनाजच्या या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. शहनाज गिल 'बिग बॉस 13' मध्ये दिसली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. याच कार्यक्रमात शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची मैत्री झाली होती.
संबंधित बातम्या
Ganapath Movie : 'गणपत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, फोटो शेअर करत दिली माहिती
Ranveer Singh 83 : '83' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंह आणि कपिल देवला अश्रू अनावर, कपिल म्हणाला...
Priyanka Chopra : अखेर Priyanka Chopra ने घटस्फोटाच्या अफवांवर सोडले मौन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha