Ranveer Singh 83 : '83' सिनेमा 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. '83' सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन दरम्यान रणवीर सिंह आणि कपिल देवला अश्रू अनावर झाले. 

Continues below advertisement

कबीर खानच्या '83' या चित्रपटाचा एक भाग असल्याने रणवीर सिंहदेखील भावूक झाला आहे. कबीर म्हणाला,"या सिनेमाच्या प्रक्रियेचा एक भाग असणं ही सर्वात आनंददायी गोष्टी आहे". तर कबीर खान म्हणाला,"आज खरचं माझ्याकडे शब्द नाहीत". दरम्यान कबीर खान आणि रणवीर सिंहला अश्रू अनावर झाले. 

सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली आहे. तर दीपिका या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर '83' चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट 3D मध्ये पहायला मिळणार आहे.

Continues below advertisement

रणवीरचे आगामी सिनेमे83 सिनेमासोबतच दीपिका या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर 83 चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट 3D मध्ये पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

83 Movie : दिल्लीत '83' सिनेमा करमुक्त, 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

Ranveer Singh in 83 Movie: 6 महिने दिवसरात्र मेहनत, तासन् तास मैदानावर सराव; कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरची अशी तयारी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha