कबीर सिंहने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी ) 20.21 कोटी रुपयांची कमाई करत शानदार ओपनिंग मिळवली. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत अजून वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाने शनिवारी 22.71 कोटी आणि रविवारी 27.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकेण्डनंतरही चित्रपटाची घौडदौड सुरुच आहे. सोमवारी चित्रपटाने 17.54 कोटी आणि मंगळवारी 16.53 कोटी रुपयांची कमाई केली.
अवघ्या पाच दिवसात 'कबीर सिंह'ने 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. पाच दिवसात मिळून 'कबीर..'ने 104.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आठवड्यातील पुढील पाच दिवसात चित्रपट जोरदार कमाई करेल, असा विश्वास समीक्षकांनी व्यक्त केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेशकांनी 'कबीर..'ला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे.
या वर्षातला सर्वात जलद 100 कोटी रुपये कमावणारा 'कबीर सिंह' दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी सलमान खानच्या भारतने 4 दिवसात 100 कोटी रुपये कमावले होते. 100 कोटी रुपयांची कमाई करण्यासाठी कबीरला 5 दिवसांचा अवधी लागला.
'कबीर सिंह'ने कमाईच्या बाबतीत अजय देवगणच्या टोटल धमाल आणि दे दे प्यार दे, अक्षय कुमारचा केसरी, रणवीर सिंहचा गली बॉय, कंगना रणौतचा मणिकर्णिका, विकी कौशलचा उरी- दी सर्जिकल स्ट्राइक आणि कार्तिक आर्यनच्या लुका छुप्पी या चित्रपटांना मागे टाकले आहे.
Movie Review | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट | पिक्चर बिक्चर | ढॅण्टॅढॅण | ABP Majha