नवी दिल्लीः अभिनेता शाहिद कपूर लवकरच पिता बनणार आहे. पत्नी मीरा आणि बेबी बंपसोबत शाहिदने खास फोटो शेअर केला आहे. शाहीदने बेबी बंप आणि मिराच्या जवळून फोटो घेतला आहे. सोशल मीडियावर या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.
शाहिदने बेबी बंपसोबतचा हा पहिलाच फोटो शेअर केला आहे. जबाबदार पिता बनण्याची तयारी करत असल्याचं शाहिदने म्हटलं आहे. शाहिद सध्या आगामी 'रंगून' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
बाळ झाल्यानंतर पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी शाहिद खास सुट्टी घेणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या व्यस्त वेळापत्रकातून शाहिद पत्नीला वेळ देत आहे. दरम्यान बेबी बंपच्या आगमनाची उत्सुकता शाहीदच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.