Deva Release Date:  अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा  त्याच्या स्टाईलनं आणि  अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  आज दसऱ्यानिमित्त शाहिदनं चाहत्यांना खास गिफ्ट  दिलं आहे. त्यानं 'देवा' (Deva) या त्याच्या आगामी चित्रपटातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.


शाहिदचा डॅशिंग लूक


शाहिदनं सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहिद हा व्हाईट शर्ट, डोळ्यावर गॉगल आणि हातात बंदुक अशा डॅशिंग लूकमध्ये  दिसत आहे. शाहिदनं हा फोटो शेअर करुन देवा या त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. 


कधी रिलीज होणार देवा चित्रपट?


'देवा' हा चित्रपट  11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  देवा चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज करणार असून झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.






शाहिदचे चित्रपट


शाहिदने 2003 मध्ये इश्क-विश्क या रोमँटिक कॉमेडी  चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर या शाहिदनं  'जब वी मेट', 'हैदर', 'उडता पंजाब' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. ‘कबीर सिंह’ या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच शाहिदनं ‘फर्जी’ या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ‘ब्लडी डॅडी’ या त्याच्या ओटीटीवरील चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता शाहिदचे चाहते त्याच्या देवा या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


तसेच शाहिदचा आणखी एक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटात शाहिद हा कृती सेननसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाची माहिती अजून देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी शाहिद आणि कृती यांच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले


इतर महत्वाच्या बातम्या:


Shahid Kapoor Angry On Paparazzi:  'ओरडू नका...'; फोटोग्राफर्सवर भडकला शाहिद कपूर, व्हिडीओ व्हायरल