मुंबई : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्यांचं फॅनफॉलोईंगही चांगलं आहे. शाहिद आणि मीरा त्यांचं त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी करण्याच्या विचारात आहे. ही बातमी वाचून दोघांच्या चाहत्यांनाही फार आनंद झाला असेल.


एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, शाहिदची पत्नी मीरानेच याबाबत सांगितलं.

शाहिद आणि मीरा 7 जुलै 2015 रोजी एकमेकांचे झाले. 26 ऑगस्ट 2016 ला त्यांच्या संसाररुपी वेलीवर मीशा नावाचं फूल उमललं. सुरुवातीला दोघांनी मुलगी मीशाला मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे दोघे मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

मीराने मुलाखतीत सांगितलं की, "सुरुवातीला मी बाळाबाबत कम्फर्टेबल नव्हते. पण काळानुसार सगळं शिकले. प्रॅक्टिसनेच माणून परफेक्ट बनतो. शाहिदने मला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. यासाठी मी त्याचं कौतुक करते."

सोशल मीडियावर अशीही चर्चा होती की, मीरा कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ही केवळ अफवा असल्याचं सांगत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला. तू कधी बॉलिवूडमध्ये येणार असा प्रश्न विचारलं असता ती म्हणाली की, "नाही, मी बॉलिवूडमध्ये येणार नाही, कारण मी दुसरं बाळ प्लॅन करत आहे. त्यानंतरच नक्की ठरवेन"

शाहिद कपूर सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण प्रमुख भूमिकेत आहेत. वर्षअखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.