मुंबईः शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सत्रात आपल्या चाहत्यांना फनी अंदाजात उत्तरं दिली. एका चाहत्याने शाहरुखला फोन नंबर मागितला. त्यावर फोन नंबरच काय माझं आधार कार्ड पण तुझ्या घरी पाठवतो, अशा शब्दात शाहरुखने चाहत्याला हटके उत्तर दिलं.
शाहरुखने खास चाहत्यांसाठी ट्विटरवर 'आस्क एसआरके' हे सत्र ठेवलं होतं. यावेळी शाहरुखने चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली. चाहत्यांनीही शाहरुखला खाण्यापिण्यापासून ते शुटिंगच्या तयारीपर्यंतची प्रश्न विचारली. शाहरुखनेही याला तेवढ्याच खास शैलीत उत्तर दिली.
ट्वीटची उत्तरं शाहरुख स्वतः देत आहे, की कोणी मदत करत आहे, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. त्यावर शाहरुखने हटके उत्तर दिलं. मी सध्या बेरोजगार आहे, म्हणून स्वतःच सर्वांना उत्तरं देत आहे, असं शाहरुखने उत्तर दिलं.