Shah Rukh Khan :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 18 सप्टेंबर रोजी 72 वा वाढदिवस होता. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan)  देखील नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. ' सर, एक दिवस सुट्टी घेऊन वाढदिवस साजरा करा' अशी हटके पोस्ट शाहरुखनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. शाहरुखच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


शाहरुख खानची पोस्ट


शाहरुखनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही केलेले समर्पण अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळो आणि तुमचे आरोग्य चांगले राहो, ही प्रार्थना. सर, एक दिवस सुट्टी घेऊन वाढदिवस साजरा करा.'






 बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा


अभिनेत्री कंगना रनौतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिनं पोस्टमध्ये लिहिलं की, बालपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास किती अविश्वसनीय आहे.' कंगना आणि शाहरुख यांच्यासोबतच परेश रावल,अनुपम खेर,अक्षय कुमार, किरण खेर,रितेश देशमुख या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


शाहरुखचे आगामी चित्रपट


अभिनेता शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ या थ्रिलर चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत दिसणार आहे. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुख साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत एटलीच्या ‘जवान’ या चित्रपटातही दिसणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!